Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee 7 th pay Commission 4 installment & Da increase Paid in jun Month ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के डी.ए व सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता मिळणार असल्याने , कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दुहेरी फायदा होणार आहे .

वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासुन 04 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार असल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना आता एकुण 50 टक्के दराने डी.ए लागु करण्यात येणार आहे , याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत निर्गमित होण्याची शक्यता आहे .

म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुन पेड इन जुलै वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत वाढीव 50 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ डी.ए फरकासह ( माहे जानेवारी ते मे )  अनुज्ञेय करण्यात येईल .

सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता : राज्य शासनांच्या वित्त विभाग दिनांक 30.01.2019 नुसार सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी सन 2019-20 पासुन पुढील 5 वर्षांमध्ये 5 समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश आहेत राज्यांत कोविड -19 रोगाच्या साथीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना / निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 01 जुलै 2021 रोजी देय असलेला 7 व्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता हा दिनांक 09 मे 2022 रोजीच्या निर्णयानुसार अदा करण्यात आले .

तर 01 जुलै 2022 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता हा जून 2023 च्या वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करण्यात आला . तर आता जुलै 2023 मध्ये देय सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुन वेतन देयकासोबत अदा करण्यात येईल ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *