Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee 5 demand Accepted ] : राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या 5 महत्वपुर्ण प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आलेल्या असून , सदर मागण्यांवर अधिकृत्त कार्यवाही सुरु असल्याचे , मा.मुख्य सचिव यांच्याकडून नमुद करण्यात आलेले आहेत .

दिनांक 24 जुन 2024 मंत्रालयीन दालनांमध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांची राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली , सदर बैठकीमध्ये राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली , तर यांमध्ये काही मागण्यांवर सध्य स्थितीत अधिकृत्त कार्यवाही सुरु असून , याबाबत सध्या सुरु असलेल्या अधिवेशनांमध्ये प्रस्ताव चर्चेला जावून याबाबत निर्णय घेण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना : राज्यातील एनपीएस धारकांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव हा दिनांक 01 मार्च 2024 पासुनच राहणार असून , त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होणार असल्याचा निर्वाळा मा.मुख्य सचिव श्री.नितीन करीर यांनी चर्चेसमयी दिला आहे .

वाढीव महागाई भत्ता ( DA ) : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढ सत्वर मंजूर करण्यात येईल , असे नमुद करण्यात आलेले आहे .

निवृत्तीचे वय 60 वर्षे : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करणेबाबतचा अधिकृत्त प्रस्ताव मा.मंत्री पातळीवर सादर करण्यात आला असल्याचे नमुद करण्यात आला आहे .

सेवानिवृत्ती उपदान : राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपये ऐवजी केंद्र सरकार प्रमाणे 25 लाख रुपये इतकी निश्चित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे .

शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न : राज्यातील शिक्षके तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सेवांतर्गत प्रश्न जसे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( 12 , 24 ) व बक्षी समितीत शिफारस केल्यानुसार तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जुलै 2024 मध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करुन योग्य निर्णय घेतले जाणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *