Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee 06 big Shasan Nirnay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय (GR) पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात .
तलाठी पदाची पदनामामध्ये बदल : महसूल विभाग अंतर्गत कार्यरत तलाठी पदाचे पदनाम बदलून “ग्राम महसूल अधिकारी” करणेबाबत , दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार (GR) मंजुरी देण्यात येत आहे . सदर पदनाम बदलानंतर सध्याच्या “गट क” संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे , नमूद करण्यात आले आहेत .
महसूल विभागातील अव्वल कारकून पदनामांमध्ये बदल : राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग अंतर्गत कार्यरत अव्वल कारकून गट क पदाचे पदनाम बदलून “सहाय्यक महसूल अधिकारी” करणेबाबत , दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , मान्यता देण्यात येत आहे . सदर पदनामामध्ये बदल केल्याने , कोणत्याही प्रकारची वेगळी वेतनश्रेणी लागू होणार नसल्याचे , नमूद करण्यात आले आहेत .
कोतवाल पदाचे पदनामामध्ये बदल : महसूल विभाग अंतर्गत कार्यरत कोतवाल पदाचे पदनाम बदलून “महसूल सेवक” करणेबाबत , दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , मान्यता देण्यात येत आहे . सदर पदनाम बदलामुळे भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यानुसार , वेतनश्रेणी लागू करणे बाबतची कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार असल्याचे , स्पष्ट करण्यात आले आहेत .
सैनिकी शाळेतील शिक्षक नियमित वेतनश्रेणीवर : सैनिकी शाळांना आदिवासी मुलांकरिता इयत्ता अकरावी व त्यापुढील वर्षी इयत्ता बारावीची तुकडी याप्रमाणे मंजूर केलेल्या एकूण आठ अतिरिक्त तुकड्यावरील एकूण 23 शिक्षकीय पदे नियमित वेतनश्रेणीवर निर्माण करणे बाबत , शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
समग्र शिक्षा योजने अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पद्धतीने कार्यरत , असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारस करण्याकरिता समितीचे गठन करण्यात आले आहेत ..
या संदर्भातील 06 शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता Click Here
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.