Spread the love

लाईव्ह मराठी पेपर ,संगीता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकारी त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना माहे मे महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागू करणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 29 मे 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महागाई भत्ता मध्ये चार टक्क्याची वाढ : केंद्र सरकारच्या कार्मिक ,लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय त्याचबरोबर वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापणानुसार महाराष्ट्र शासन सेवेतील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांच्या महागाई भत्ता मध्ये जानेवारी 2023 पासून चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे .

सदर वाढीव चार टक्के महागाई भत्ता वरील नमूद अधिकारी / पेन्शनधारकांना माहे मे पेड इन जून महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने , अदा करण्यात येणार असून सदर देयकासोबत जानेवारी 2023 पासून DA फरकाची रक्कम देखील अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

जून महिन्याचे वेतन देयकासोबत राज्यातील उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात करण्यात येईल , अशी माहिती समोर येत आहे .

4% DA वाढ संदर्भातील सविस्तर GR पुढील प्रमाणे आहे ..

आपण जर शासकीय ,निमशासकीय शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक असाल तर खालील Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *