Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state cabinet nirnay dated 23 July 2024 ] : केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक 23 जुलै 2024 रोजी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडून सादर करण्यात आली आहे . या अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्र राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत , सदर मंत्रिमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे पाहूयात ..

आशा स्वयंसेविका यांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय : राज्यातील कार्यरत आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . आशा स्वयंसेविका ऑन ड्युटी कार्यरत असताना , मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये इतके सानुग्रह  अनुदान दिले जाणार आहे . तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची तात्काळ मदत दिली जाणार आहे .अशा प्रकारचा निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे,  सद्यस्थितीमध्ये राज्यात 75,568 इतक्या आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत .

शेती पिकांचे नुकसान ठरवण्याकरिता अद्यावत प्रणाली विकसित  : शेती पिकांचे नुकसान झाल्यास , शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करता यावी , याकरिता  नुकसान ठरवण्याकरिता अद्यावत प्रणाली विकसित करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे . तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या पद्धतीनेच नुकसान भरपाई देण्याचे नमूद करण्यात आले आहेत .

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना : राज्यातील धनगर समाजातील गरिबांना राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत मेंढी पालन करीत आहे मेंढी खरेदी साठी अनुदान दिले जाते . सदर योजना सन 2017 पासून कार्यरत असून , सदर योजनेस पुढे चालू ठेवण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.  याकरिता चालू वर्षांमध्ये सदर योजना अंतर्गत 29 कोटी 55 लाख रुपये इतके रक्कम खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

याशिवाय नाशिक येथील मौजे अंबड येथे एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी 16 हेक्टर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई मध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  तसेच राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षणाचा लाभ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *