Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Cabinet meeting dated 11.03.2024 ] : दिनांक 11 मार्च 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांकरीता 05 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . सविस्तर मंत्रीमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचा लाभ : राज्यातील खासगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळांमधील कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . याकरीता आवश्यक 53 कोटी 86 लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे . शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात येते , त्याच धर्तीवर खासगी शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देखिल दोन लाभांची सदर योजना दिनांक 01.01.2024 पासुन लागु करण्यात येणार आहे .
GST मध्ये नव्याने 522 पदांना मान्यता : वस्तु व सेवा कर ( राज्य ) विभाग मध्ये नव्याने 522 पदांना मान्यता देण्याचा मोठा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे . यांमध्ये अपर राज्य कर आयुक्त – 9 पदे , राज्य कर सह आयुक्त – 30 पदे , राज्य कर उपायुक्त 36 , सहाय्यक राज्य कर आयुक्त 143 , राज्य कर अधिकारी 275 , राज्य कर निरीक्षक 27 , स्वीय सहाय्यक 02 , लघुलेखक गट अ अशा एकुण 522 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे .
पदवीधारकांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ : राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय त्याचबरोबर श्रमिक भरपाई आयुक्त मधील एलएलएम पदवी धारण करणाऱ्या न्यायिक अधिकारी यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचा लाभ न्यायिक अधिकाऱ्यांना पदवी धारण केल्याच्या दिनांकापासून प्राप्त करण्यात येणार आहेत . याकरीता 49 लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे .
राज्य उत्पादन शुल्क विभागात सह आयुक्त पद : राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये सह आयुक्त हे पद मंजूरीस मान्यता देण्यात आली आहे . यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये संचालक हे पद रद्द करुन वरीष्ठ दर्जाचे सह आयुक्त ( वेतनश्रेणी : 78800-209200) हे नव्योन पद निर्माण करण्यात येत आहेत .
अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ : राज्यातील आदिवासी विकास विभागातील 61 अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे . यामुळे अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदस्थापना मिळणार आहे . यांमध्ये पुढील वर्षांपासून 8 वी पासुन इयत्ता 9 वी आणि 2026-27 पासुन 10 वी चा वर्ग अशा एकुण 17 अनुदानित शाळा आहेत तर , 44 अनुदानित माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालये ( कला व विज्ञान ) वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.