Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Anudanit Teacher & Non Teaching Staff Payment Shasan Paripatrak ] : राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे कर्मचाऱ्यांना वेतन ,वेतन पथक ( प्राथमिक ) मार्फत अदा करणेबाबत लेखाशीर्ष 22023261/36 वेतन सन 2024-25 तरतुद वितरणाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मार्फत दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अदा करण्यात येते सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान ( वेतन ) या बाबीखाली रक्कम रुपये 2,70,64,88 /- इतकी तरतुद मंजूर झालेली आहे . सदर लेखासांकेतांक  22023261/36 सहाय्यक अनुदाने ( वेतन ) या बाबीखाली रुपये 115,02,58/- इतकी तरतुद संगणक प्रणालीवर वितरणासाठी उपलब्ध झालेली आहे .

सन 2024-25 या आर्थिक वर्षात खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वेतनासाठी रुपये 58,65,16/- हजार इतकी तरतुद वितरीत करण्यात येत आहे . सन 2024-25 या आर्थिक वर्षात वितरीत करण्यात आलेला निध / अनुदान आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना परिपत्रकांमध्ये नमुद अटी / शर्तींच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे .

सदरचा निधी हा ज्या उद्देशासाठी निधी / अनुदान मंजूर आहे , त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही , तसेच इतर लेखार्शीर्षासाठी वळती करता येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . सदर खर्चाचा प्रगती मासिक निधी विवरणानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेवून अनुदान अदाकरण्याचे तसेच परिपत्रकांमध्ये नमुद इतर तरतुदी पाहण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागांकडून दिनांक 04.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन परिपत्रक

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *