Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state all post recruit by MPSC Portal ] : राज्य शासन सेवेतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील (वाहन चालक पद वगळून ) हे पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत भरण्याची कार्यपद्धती प्रसिद्ध करणेबाबत , सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णय नुसार राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील वाहन चालक पदे वगळून इतर सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे , तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC ) सक्षमीकरण करणे , याकरिता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अपर मुख्य सचिव , सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीचे गठन करण्यात आले आहेत.
या समितीमध्ये अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य असे एकूण पाच जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे . सदर समितीस सदर शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेली कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कक्षेत आणण्याचा पदांची विहित प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग सेवा चार कार्यासनाकडे सादर करावेत तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेले विहित नमुन्यातील प्रस्ताव एकत्रितरीत्या समन्वय समितीकडे शिफारसीसाठी सामान्य प्रशासन विभाग सेवा चार कार्यसन मार्फत सादर करण्यात येतील , असे नमूद करण्यात आले आहेत .
तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कक्षेत आणलेल्या गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील वाहन चालक पदे वगळून यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण व अनुषंगिक सोयी सवलती यापुढेही लागू राहतील असे नमूद करण्यात आले आहेत .

