Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ SSC & HSC RESULT UPDATE NEWS ] : राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांचे वातावरण आहेत , अशांतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वी परीक्षांचा निकाल कधी लागणार याबाबत महत्वपुर्ण अपडेटअ समोर येत आहे .
10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणीची कामकाज जवळपास 100 टक्के पुर्ण झालेले असून , सध्या मार्क संगणीकृत करण्याचे कामकाज सुरु आहेत . यामुळे लोकसभा निवडणूकाचा निकाल लागण्याच्या अगोदरच राज्यात दहावी / 12 वी बोर्डाचा निकाल लागण्याची मोठी शक्यता आहे . दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे .
या दिवशी लागणार निकाल : प्रसार माध्यमातुन मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ( Result ) हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिनांक 30 मे अथवा 31 मे 2024 पर्यंत जाहीर करण्यात येईल . तर SSC ( इयत्ता 10 वी चा निकाल ) दिनांक 02 जुन अथवा 03 जुन 2024 पर्यंत लागण्याची शक्यता आहे .
दिनांक 04 जुन 2024 रोजी राज्यात लोकसभा निवडणूकाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे . म्हणजेच दहावी / 12 वी चा निकाल हा लोकसभा निवडणूका निकाल जाहीर होण्यापुर्वीच लागणार आहे . आगामी वर्षांमध्ये नविन शैक्षणिक धोरण लागु करण्यात येणार असल्याने , निकाल हे विहीत कालावधीमध्ये जाहीर केला जाणार आहे .
निकाल कसा पाहाल : निकाल पाहण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत्त संकेतस्थळ mahahsscboard.in व mahresult.nic.in यावर पाहता येईल , यंदाच्या वर्षी राज्यात दहावी व बारावीची परीक्षा एकुण 31 लाख विद्यार्थ्यांने दिली आहे , यामुळे सदर विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे निकालाकडे आतुरतेने वाट पाहत आहेत .