Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ SSC HSC BOARD EXME 2025 TIMETABLE ] : इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2025 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत . यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता येणार आहेत .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावी बोर्ड परीक्षा सन 2024-25 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत , यांमध्ये इयत्ता 12 वी च्या परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळांमध्ये होणार आहेत .

तर इयत्ता 10 वी ( माध्यमिक ) च्या परीक्षा च्या दिनांक 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये होणार असल्याचे नमुद करण्यात आलेल्या आहेत . अशा प्रकारचे प्रसिद्धीपत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यिमक मंडळा मार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहेत .

राज्यांत माध्यमिक व उच्च माध्यिमक शिक्षण मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर , नागपुर , पुणे , कोल्हापुर , मुंबई , नाशिक , लातुर , कोकण , अमरावती अशा एकुण 09 विभागीय मंडळामार्फत इ. 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येतात .सदर परीक्षा दरवर्षी ह्या फेब्रुवारी महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापासुन मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत घेण्यात येतात .

बोर्डाकडुन दहावी बोर्ड परीक्षांच्या नियोजित तारखा : दिनांक 21 फेब्रुवारी ते दिनांक 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये होतील , तर प्रात्यक्षिक , अंतर्गत मुल्यमापन , तोंडी परीक्षा दिनांक 03 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

बोर्डाकडुन बारावी बोर्ड परीक्षांच्या नियोजित तारखा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत , तर अंतर्गत मुल्यमापन , तोंडी परीक्षा , प्रात्यक्षिक , श्रेणी या बाबी दिनांक 24 जानेवारी ते 10.02.2025 या कालावधीमध्ये होणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *