Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabeen Highest Rate In India See detail ] : सध्या सोयाबिनच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे , परंतु देशात सर्वच ठिकाणी सोयाबिनला सारखे भाव नाहीत , तर काही ठिकाणी सोयाबिनला उच्चांकी भाव मिळत आहेत .
राज्यात काल दिनांक 14.02.2024 रोजी सांगली कृषी बाजार मध्ये सर्वाधित भाव 4,850/- रुपये एवढा मिळाला आहे , तर त्यापाठोपाठ ढाणकी कृषी बाजार मध्ये 4,620/- रुपये ऐवढा भाव मिळाल आहे . तर राज्यात इतर कृषी मार्केट मध्ये सोयाबिनला सर्वसाधारण दर हे 4500/- रुपये पेक्षा कमीच आहेत . यामुळे शेतकऱ्यांना तोट्यांमध्येच सोयाबिन विकावे लागत आहेत . यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून सोयाबीवन हमी भाव करुन किंमतीत वाढ करण्याची अपेक्षा आहे .
या कृषी बाजार मार्केटमध्ये सोयाबिनला मिळत आहेत , सर्वाधिक उच्चांकी भाव : देशात सर्वच राज्यात कृषी मालाला सारखाच भाव नसतो , क्षेत्राच्या कृषी मालाच्या उपलब्धतेनुसार , बाजारमुल्य ठरत असते . यामुळे देशात सोयाबिनला काल दि.14.02.2024 रोजी सर्वाधिक उच्चांकी दर 5,330/- रुपये एवढा भाव बिहार राज्यातील किशनगंजर या कृषी मार्केटमध्ये मिळाला आहे , तर त्यापाठोपाठ बेगूसराय या कृषी मार्केट मध्ये 5,275/- एवढा भाव प्रति क्विंटल मिळाला आहे .
माहे फेब्रुवारी महीन्यातच भावांमध्ये तेजी दिसून येत आहेत , तर राज्यात आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने भावात मंदी दिसून देत आहेत . बिहार मधील वरील दोन बाजार मार्केटमध्ये सर्वाधिक भाव मिळत असल्याने , राज्यातील व्यापारी सोयाबिन विक्री सदर राज्यात करुन नफा मिळवत आहेत .
भविष्यात सोयाबिनचे दर वाढणार का ? : राज्यात सध्या सोयाबिनच्या भावामध्ये मंदी दिसत आहे , यामुळे शेतकरी देखिल सोयाबिनची विक्री करणास बंद करतील , यामुळे आवक कमी होईल , व परत सोयाबिनच्या भावांमध्ये वाढ होईल , कारण बरेच शेतकरी सोयाबिनला चांगला भाव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत .