Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Retes Increase News ] : सोयाबीनचे दर 5000/- रुपयावरुन थेट 4200/- पर्यंत दर घसरल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा तोट्यांमध्ये सोयाबीन विकावे लागत आहेत . सोयाबीन काढणीनंतर माहे सप्टेंबर -डिसेंबर दरम्यान सोयाबिनला 5300/- रुपये उच्चांकी दर मिळाला होता .त्यानंतर सोयाबिनच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे .

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीच्या भावांमध्ये सोयाबिन विकावे लागत आहे . सोयाबिनचे भाव हे गोड तेलावर अवलंबून आहे , तर सोयाबिनच्या उपलब्धतेनुसार गोड तेलाचे भाव निर्धारित होते , सध्या बाजारांमध्ये सोयाबिनचा पुरवठा सुरळीत होता , परंतु सोयाबिनच्या कमी झालेल्या भावांमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात आहे .

सोयाबिनच्या साठवणूक मोठ्या प्रमाणात झाल्याने , आता गोड तेल बनविणाऱ्या कंपन्या करीता सोयाबिनची आवक कमी झाली आहे . मागील आठवड्यांपासून गोडतेलाच्या दरांमध्ये प्रति किलो 5-12 रुपयांपर्यंतची वाढ झालेली आहे . यामुळे आता सोयाबिनला देखिल बाजारभाव मिळणार आहे . आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखिल गोडेतेलाचे दर वाढले आहेत , यामुळे गोड तेलाची आयात करणे भारतीय व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत .

यामुळेच तेलबिया ( सोयाबिन , करडई , सुर्यफूल , शेंगदाणे ) यांचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे . कालचा राज्यातील सोयाबिनचा बाजारभाव पाहिला असता , काल दिनांक 22.03.2024 रोजी सोयाबिनला सांगली कृषी मार्केट मध्ये सर्वाधिक 4670/- रुपये इतका भाव मिळाला .तर ढाणकी कृषी मार्केट मध्ये सोयाबिनला 4550/- रुपये इतका बाजारभाव मिळाला . राज्यातील इतर कृषी मार्केट मध्ये सर्वासाधारण पणे 200/- ते 300 रुपयांची वाढ झाली आहे .

इतर कृषी मार्केट मध्ये सोयाबिनला मिळालेले बाजारभाव : अमरावती – 4307 , जळकोट – 4300 , दिग्रस – 4335 ,यवतमाळ 4272, राहता – 4310/- , छ.संभाजीनगर – 4025/-, पुणे – 4290 , गेवराई – 4325/-, बार्शी – 4450/- , हिंगोली -4325 , लातुर – 4560

पुढच्या महिन्यात सोयाबिनला मिळणार उच्चांकी भाव : पुढच्या महिन्यांत सोयाबिनचे भाव हे 5000/- पेक्षा अधिक होईल , असे मत कृषी तज्ञांचे मत आहे , कारण सोयाबिनची घटती आवक व खाद्य तेलाचे वाटते भाव यामुळे सोयाबीनचे भाव पुढील महिन्यांत 5 हजार पेक्षा अधिक होईल . यामुळे सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *