Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Price Rate Update ] : सध्याच्या घडीला सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ होण्यापेक्षा घट होताना दिसून येत आहेत . हमीभावापेक्षा देखिल कमी दराने सोयाबीनची विक्री केली जात आहे , यामुळे राज्यातील शेतकरी हे आर्थिक संकटांमध्ये सापडले आहेत .
सध्या राज्यातील बाजारसमितीमध्ये सोयाबीनचे दर पाहिले असता , सोयाबीनला किमान 2500/- , 3500/- इतका निच्चांकी भाव मिळत आहेत , तर काही ठिकाणी हे बाजारभाव 4000/- इतक्या किमान दरांमध्ये विक्री केला जात आहे . राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये सोयाबिला प्रति क्विंटल 4200/- रुपये इतका बाजारभाव मिळत आहे , सोयाबीनचे MSP ( किमान विक्री किंमत ) 4600/- रुपये आहे .
तरी देखिल सोयाबीनला हमीभाव देखिल राज्यातील बऱ्याच बाजारसमितीमध्ये मिळत नाही . यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन खर्च देखिल निघणे शक्य होत नाही . सोयाबीन हे एक प्रकारचे नगदी पिक ( तेलबियाणे ) आहे . तर राज्यांमध्ये या पिकाचे उत्पादन मराठवाडा व विदर्भांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते . मराठवाडामध्ये फक्त खरीप हंगामामध्येच सोयाबीनचे पिक घेतले जाते , त्यानंतर रब्बी हंगामामध्ये पाण्या अभावी कोणतेही पीक येत नाहीत .
यामुळे या भागातील शेतकरी सोयाबीनचा चांगला बाजारभाव मिळत नसल्याने , आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहेत . यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे अधिक आवश्यक आहे . परभणी येथील सेलू बाजारसमितीमध्ये सोयाबीनला 2250/- रुपये प्रति क्विंटल इतका निच्चांकी भाव मिळाला या मुळे शेतकऱ्यांस मोठा आर्थिक फटकांचा सामना करावा लागला .
लोकसभा निवडणूकांमध्ये शेतकऱ्यांनी दाखवला रोष : नुकतेच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांनी विद्यमान महायुतीच्या उमेदवारांना नापसंती दर्शवत , महाविकास आघाडी सरकारला विजयी केले . यावेळी पश्चिम महाराष्ट्रांमध्ये कांदा प्रश्नावर व मराठवाडा व विदर्भांमध्ये सोयाबीन , कापुस बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी विद्यमान महायुतीच्या उमेदवारांना पराभुत केले .