Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean New Seeds ] : कृषी संशोधकांनी सोयाबीनची नविन वाण विकसित करण्यात आलेली आहे , ज्यांमध्ये हेक्टरी उत्पादन हे 50 क्विंटल इतकी होते . यामुळे शेतकऱ्यांसाठी ही नविन वाण लाभदायक ठरणार आहे . जाणून घेवूयात या नविन / संकरित वाणीबद्दल सविस्तर …
सोयाबिनचे उत्पादन राज्यात विदर्भ , मराठवाडा त्याचपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात काही प्रमाणात सोयाबिनचे उत्पादन घेतले जाते . सोयाबीनचे उत्पादन राज्यात सर्वाधिक विदर्भ व मराठवाड्यात घेतण्यात येते . देशांमध्ये महाराष्ट्र राज्याबरोबरच मध्य प्रदेश राज्यांमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येते . याचे प्रमाणे पाहिले असता …
मध्य प्रदेश राज्याच्या एकुण उत्पादनापैकी 45 टक्के इतके सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते , तर राज्यांमध्ये एकुण उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन हे सोयाबीनचे घेण्यात येते . म्हणजेच सोयाबीन उत्पादनांमध्ये देशात मध्य प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक तर महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो . सोयाबीन हे नगदी पिक आहे , यामुळे शेतकरी भाव वाढीनंतर सोयाबीनची विक्री करतात , अन्यथा साठवणूक करतात .
सोयाबीनची नविन वाण विकसीत : कृषी संशोधकांनी एकरी उत्पादन वाढावे याकरीता NRC 188 ही सोयाबीनची अलीकडेचे विकसीत करण्यात आलेली मुख्य जात आहे . या वाणीच्या सोयाबीन हे अत्यंत दर्जेदार व दुर्गंधीमुक्त आहे . याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ज्याप्रमाणे आपण कच्चा वाटाणांच्या शेंगा खाण्यासाठी वापर करतो , त्याप्रमाणे या वाणीच्या सोयाबीनच्या कच्चा शेंगा खाण्यासाठी वापर करु शकतो , कारण याची चव देखिल वाटाण्यांसारखी येते .
एकरी उत्पादन : या वाणीच्या सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन हे 40 ते 45 क्विंटल एवढे होते , ह्या जातीच्या सोयाबीनचा वापर कच्या शेंगा तसेच सोयाबीन दाण्यासाठी अशा दुहेरी उत्पादनासाठी वापर केला जाऊ शकतो . ही जात कृषी संशोधन केंद्र इंदुर मध्ये विकसीत करण्यात आलेली आहे . या जातीची वाण राज्यांमध्ये मराठवाडा , विदर्भ मध्ये पेरणीकरीता अधिकसूचित करण्यात आलेली आहे .