Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Market Price Update News ] : मराठवाडा व विदर्भाचे खरीप हंगामातील प्रमुख पिक म्हणजे पिवळा सोयाबीन होय . मराठवाडा व विदर्भामध्ये शक्यतो , खरीप हंगाम मध्येच पिकांची उत्पादन होते , त्यानंतर रबी हंगामाध्ये पाण्या अभावी पिके घेण्याचे प्रमाण कमी असते .
सोयाबिनचे उत्पादन लातुर , बीड , धाराशिव , अमरावती , यवतमाळ , अकोला , नागपुर , बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पिकं घेतले जाते . सध्यस्थितीमध्ये सोयाबीनला हवा तसा भाव मिळत नसल्याने , बाजार समितीमध्ये , आवक कमी होत आहे . परंतु हळु हळू सोयाबीनच्या आवक व किंमीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे .
लातुर मध्ये सोयाबिन पासुन तेल उत्पादन करणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत , कारण लातुर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सोयाबिनचे उत्पादन घेण्यात येते . म्हणून कंपन्याना कच्चा माल कमी पडत असल्याने , सोयाबिनच्या भावांमध्ये वृद्धी होताना दिसून येत आहे . मराठवाडा व विदर्भ मधील सोयाबनच्या पिवळा जातीला किती बाजारभाव मिळत आहे याचा सविस्तर चार्ट पुढीलप्रमाणे पाहूयात ..
अ.क्र | जिल्हा | सर्वसाधारण दर |
01. | लातुर | 4475/- |
02. | यवतमाळ | 4395/- |
03. | परभणी | 4200/- |
04. | हिंगोली | 4325/- |
05. | धाराशिव | 4450/- |
06. | जालना | 4500/- |
07. | वर्धा | 4150/- |
सोयाबीनला हवा तसा बाजारभाव मिळत नसल्याने , बाजारसमिती मध्ये आवक खुपच कमी आहे , अनेक शेतकरी सोयाबिनच्या बाजारभाव वाढीसाठी प्रतिक्षा करत आहेत . तर अनेक शेतकरी हे सोयाबिन शेतमालावर कर्ज घेवून , आपली आर्थिक अडचण दुर करुन घेत आहेत .