सोयाबीन , कापुस व कांद्याला अच्छे दिन ; बाजारभावांमध्ये होत आहे चढत्या किंमतीने वाढ !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean , kapus , Kanda Bajarabhav ] : सध्या राज्यातील सोयाबीन , कापुस , व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येत आहेत , कारण सध्या बाजारामधील आवक मोठ्या प्रमाणात घटली होती , यामुळे वरील पिकांच्या बाजारभावांमध्ये वाढ झाल्यानंतर हळूहळू आवक वाढण्यास सुरुवात आहे . परंतु आवक ही घटत्या प्रमाणात वाढत असल्याने , बाजारांमध्ये आवश्यक कांदा , सोयाबीन , व कापुस उपलब्ध होत नसल्याने , मागणी मध्ये वाढ होत आहे .

यामुळेच मागणीच्या नियमानुसार , मागणी वाढली कि , किंमत वाढते यामुळे सध्या बाजारांमध्ये आवक कमी असणाऱ्या शेत पिकांच्या बाजारभावांमध्ये वाढ होताना दिसून येत आहेत . आपण जर सोयाबिनचा विचार केला तर , सोयाबीनला 5400/- रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव माहे जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मिळाला होता , त्या हिशोबाने शेतकरी व घाऊक व्यापारी सोयाबीनची साठवणूक केली आहे , म्हणजेच शेतकरी व व्यापाऱ्यांना 5400/- रुपये प्रति क्विंटल दरम्यान बाजारभाव अपेक्षित आहे .

काल दिनांक 25.04.2024 रोजीचा बाजारभाव पाहिला असता , राज्यात बऱ्याच बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4500/- रुपये इतका सर्वधारण बाजारभाव मिळाला आहे , मागील आठवड्यांपेक्षा सोयाबीनच्या बाजारभावामध्ये 250/- रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ झालेली आहे .

तर कापुसाला मागील आठवड्यात 7200/- रुपये इतका सर्वसाधारण बाजारभाव मिळत होता , काल दिनांक 25.04.2024 रोजी कापसाच्या बाजाराभावामध्ये 600/- रुपयांची वाढ झालेली आहे , यामुळे कापसाला सर्वसाधारण 7800/- रुपये इतका बाजारभाव मिळत आहे .

तर कांद्याला मागील आठवड्यांमध्ये सर्वसाधारण 1250/- ते 1400/- रुपये इतका प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता , तर काल दिनांक 25.04.2024 रोजी कांद्याला प्रति 1350/- रुपये ते 1500/- रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळत आहे .

Leave a Comment