Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean  hamibhav online registration mudatvadh] : सोयाबीनला 4,892/- रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर अर्ज प्रक्रिया कशी करावी ?  त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासंदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .

मागील वर्षीपेक्षा यावर्षी 292/- रूपये प्रति  क्विंटल हमीभावामध्ये वाढ करण्यात आली आहे . याशिवाय सोयाबीन खरेदी करिता केंद्राची संख्या देखिल वाढवण्यात आलेली आहे . महाराष्ट्र राज्यात सदर हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेड व एन सी सी एफ मार्फत शेतकऱ्यांकडून अर्ज मागून सोयाबीनची खरेदी केली जात आहे .

याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नाफेड / NCCF खरेदी केंद्रावर जाऊन आपले सातबारा , आधार कार्ड,  बँकेचे पासबुक घेऊन पिकांची नोंद करून घ्यावी व विक्री व्यवस्थापनाचे नियोजन झाल्यानंतर एसएमएस प्राप्तीनंतर सोयाबीन विक्रीकरिता सदर खरेदी केंद्रावर जाऊन सोयाबीनची विक्री करता येईल .

राज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सदर हमीभावाने खरेदी करिता नोंदणी केलेली आहे , तर अद्याप सदर हमीभाव अंतर्गत सोयाबीनची विक्री करण्यासाठी ज्यांनी नोंदणी केली नाही . अशा शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या नाफेड / NCCF केंद्रावर जाऊन वरील नमूद कागदपत्रे सादर करून आवेदन सादर करावेत .

सदर हमीभावाने खरेदी करिता नोंदणीसाठी दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे . त्या अगोदरच शेतकरी बांधवांनी सदर हमीभाव अंतर्गत सोयाबीनची विक्रीकरिता नोंदणी करावी असे आव्हान सरकारकडून करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *