Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean , Cotton Producer farmer held nidhi shasan nirnay ] : राज्यातील सोयाबीन , कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत राज्य शासनांकडून अखेर शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे .
सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा की क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1000/- रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राकरीता त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000/- रुपये अर्थ सहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
वरील प्रमाणे अर्थसहाय्य करण्याकरीता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरीता रुपये 1548.34 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2646.34 कोटी रुपये अशा एकुण 4194.68 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहेत . तसेच सदरचा खर्च हा कापूस , सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मुल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखा शीर्ष 2401B419 खाली खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत .
यांमध्ये राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वरील नमुद केल्याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येईल , तसेच राज्यतील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई – पीक पाहणी ॲप / पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्य करीता पात्र ठरणार आहेत .
तसेच ई – पी पाहणी ॲप / पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करुन अर्थसहाय्य देण्यात येईल , सदरची योजना ही फक्त सन 2023 च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादीत असणार आहेत .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !