Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Cotton Madat Nidhi Update ] : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताची आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे आचार संहिता नंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत निधी दिली जाणार आहे , याबाबत माहिती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे .

 कापुस व सोयाबीनला मागील वर्षांपासून अपेक्षित बाजारभावच मिळत नाही , सोयाबीनच्या किंमती वाढल्यास , खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होईल , या कारणाने सरकारकडून देखिल सोयाबीन अपेक्षित बाजारभाव दिला जात नाही , शिवाय हमीभावामध्ये सोयाबीनचा व कापूसचा अंतगर्भाव नसल्याने , शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही .

सोयाबीन व कापुसचे उत्पादन मराठवाडा , विदर्भ व खानदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते . मराठवाडा व विदर्भाचा बहुदा भाग हा दुष्काळग्रस्त भाग आहे . येथील शेतकऱ्यांना पाणी कमी उपलब्धेमुळे फक्त खरीब हंगामातीलच पीक घेवू शकतात . जेमतेम उत्पादन होते , तरी देखिल सोयाबीन व कापूसाचा अपेक्षित बाजारभाव मिळत नाही , मागील वर्षी दुष्काळ पडला होता , तरीदेखिल सोयाबिनला सध्या 4500/- इतर उच्चतम बाजारभाव मिळत आहे .

यामुळे सदर कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याकरीता सरकारकडून मदत निधी दिली जाणार आहे , याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत : जळगाव येथे आयोजित कार्यक्रम दरम्यान सांगितले आहे .

सोयाबीन व कापुसाला भाव मिळावा याकरीता भावांतर योजना लागु केली जाणार आहे , यासाठी  राज्य सरकारकडून 4000/- कोटी रुपयांचे मदत निधी दिली जाणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , याकरीता केंद्र सरकारकडून मदत निधीची मागणी करण्यात आलेली असल्याचे सांगितले आहे .

तर सदरची मदत निधी ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग केले जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहेत . यामुळे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *