Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean & cotton (kapus) Farmer help] : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे , भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी अहमदपूर येथे बोलताना भाषणात सांगितले की , राज्यातील सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5000/- रुपये याप्रमाणे मदत निधी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे .
यंदाच्या वर्षी सोयाबीन व कापुसचे भाव फारच घसरले आहे , यामुळे शेतकऱ्यांना निदान खर्च तरी भागाव , या उद्देशाने सोयाबीन / कापूस उत्पादन शेतकऱ्यांना मदत निधी दिनांक 12 जून पूर्वी खात्यावर वर्ग केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे .
यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की सध्या आचारसंहिता सुरू असून , आचारसंहिता उठल्यानंतर सोयाबीन , कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे मदत निधीसाठी साडेचार हजार कोटी रुपयांची पॅकेज राज्य सरकारकडून जाहीर केले आहे , या पॅकेजच्या माध्यमातून कापूस , सोयाबीन उत्पादन करणारे शेतकऱ्यांना मदत होणार आहे
याशिवाय सोयाबीन तसेच कापसाला योग्य प्रकारचे भाव मिळण्यासाठी हमीभावाची घोषणा सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . लातूर लोकसभा चे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या अहमदपूर येथील प्रचार सभेमध्ये ही मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केली आहे . यामुळे आता राज्यातील सोयाबीन , कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे .
राज्यात मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये सोयाबीन, कापसाची मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते . या भागामध्ये सद्यस्थितीत मोठा दुष्काळ पडला आहे ,यामुळे या भागातील शेतकरी खरीप हंगामामध्ये पाण्याअभावी पीक घेऊ शकले नाही. म्हणून या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत , म्हणून सरकारकडून प्रती हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे मदतनिधी जाहीर करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा कृषी मंत्र्यांकडून केली आहे.