आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्याने , सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये तेजी !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी  [ soyabean bajarbhav update news ] : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने , सोयाबीन, शेंगदाणा, करडई ,सूर्यफूल अशा तेलबियाच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. याचा फायदा राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे .

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो 5/- रुपये ते 12/- रुपये अशी वाढ झाल्याने , तेलबियांच्या किमतीमधील वाढ दिसून येत आहे . तेलबियाच्या किमती ह्या खाद्यतेलाच्या किमतीवर अवलंबून असते , तर खाद्यतेलाच्या किंमती ह्या तेलबियांच्या उपलब्धतेनुसार निश्चीत होते.जसे की तेलबियांची आवक जास्त असल्यास , खाद्य तेलाच्या किंमती कमी असेल , तर आवक कमी झाल्यास खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ दिसून येते  .

सोयाबीनचा बाजार भाव वाढणार ; मागील दोन वर्षापासून सोयाबीनच्या किमतीमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे , यावर्षी सोयाबीन किंमतीमध्ये मोठी घट दिसून आली आहे ,  माहे डिसेंबर 2023 पासुन 5400 प्रतिक्विंटल पासून 4200 प्रतिक्विंटल असा बाजारभाव घसरत आला . सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल 4,400/-  ते 4,700/- दरम्यान बाजारभाव मिळत आहे . सांगली बाजार समितीमध्ये दिनांक 11 मे 2024 रोजी सोयाबीनला कमाल 4700/-  इतका बाजार भाव मिळाला आहे , जो की मागील दोन महिन्यापासून कमाल बाजारभाव ठरला आहे  .

या महिन्यामध्ये खाद्य तेलाच्या कंपनीना पुरेसा आवश्यक सोयाबीन (कच्चामाल) पुरवठा होत नसल्याने , खाद्य तेलाच्या किमतीमध्ये , झपाट्याने वाढ होत आहे . आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनची आवक कमी झाली असल्याने , खाद्यतेलांच्या किमतीमध्ये तुफान वाढ होताना दिसून येत आहे . यामध्ये सोयाबीन तेल , शेंगदाणा तेल ,करडई तेल, सूर्यफूल तेल यांचा समावेश आहे.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत आवक कमी होत गेल्यास , निश्चितच सोयाबीनला 5400/- पेक्षा अधिक बाजार भाव मिळेल , ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे .

Leave a Comment