Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rooftop Solar Scheme ] : केंद्र शासनांने या वर्षाच्या अर्थसंकल्पांमध्ये नविन सौर उर्जाची घोषणा केलेली आहे . ज्यांमध्ये देशातील कोट्यावधी नागरिकांच्या छतावर सोलर पॅनल बसविले जाणार आहेत . ज्यामंध्ये केंद्र सरकारकडून सोलर पॅनल , विजेची बॅटरी खरेदी करीता अनुदान दिले जाणार आहेत .
या वर्षीच्या अर्थसंकल्पांमध्ये सोलर योजनेकरीता तब्बल 10,000/- कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे . यानुसार देशातील तब्बल 01 कोटी कुटुंबांच्या घरावर 300 युनिट पर्यंत वीज पुरवठा होईल अशा पद्धतीने सोलर पॅनल विक्रिसाठी अनुदान दिले जाणार आहेत . देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पा अगोदरच प्रधानमंत्री सुर्योदय योजनेची सुरुवात केली होती , आता या योजनेच्या माध्यमातुन आपणांस लाभ मिळणार आहेत .
या योजनेच्या माध्यमातुन छतावर सोलर पॅनल बविण्यात येतील , व वीजेच्या साठवणूकीसाठी बॅटरी दिली जाते .आपणांस जेवढी विज आावश्य आहे तेवढी विजेचा वापर आपण करु शकतो , तर उर्वरित विजेचा महावितरण कंपनीस विक्री करुन पैसे देखिल कमवू शकतात . अशा पद्धतीने वीजेचे विक्री करुन अनेक जन पैसे कमवत आहेत , कारण सोलन पॅनल मुळे नियमित विजेची निर्मिती होत राहते .
प्रधानमंत्री सुर्योदय योजनेच्या माध्यमातुन घेता येईल लाभ : प्रधानमंत्री सुर्योदय योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणताही भारतीय नागरीक तसेच संस्था असणे आवश्यक असेल , तसेच स्वत : चे घर असायला हवे व त्यावर मोकळी जागा असणे आवश्यक असेल . तर सदरचे घर हे मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येईल अशा पद्धतीने सुविधा असणे आवश्यक असावी .
अशा पद्धतीने आपण सरकारी योजनेच्या माध्यमातुन छतावर सोलर बसवून मोफत वीजेचा वापर व अतिरिक्त विजेची महावितरण कंपनी विक्री करुन महिना 10,000/- रुपये पर्यंत कमाई करु शकतो ..