Solar panel : घराच्या छतावरती बसवा सोलर पॅनल व विजबीलापासून कायमची सुटका मिळवा ; खरेदीसाठी सरकार देते सबसिडी..

Spread the love

Live marathipepar, संगिता पवार : दिवसेंदिवस विजेची बिलांपासून व वाढत्या युनिटपासून चिंता मिटविण्यासाठी आपल्या घराच्या छतावरच सोलर पॅनल बसवून विजबिलाची कायमची चिंता मिटवू शकता . ही योजना सरकारी योजनेमधून देण्यात येते या योजनेला सरकारकडून अनुदानही देण्यात येत असल्याने सर्वसामान्यांना देखिल परवडणारी ही योजना आहे , सदर सोलर रुफटॉप योजनाबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येते . या योजनेचा लाभ घरगुती तसेच सहकारी संस्था , कल्याणकारी संस्था यांच्या छतावर सोलर उर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येईल . हे सोलर पॅनल कंपनीमार्फतच बसविण्यात येईल .सरकारच्या सोलर रुफटॉप योजनेच्या माध्यमातुन ही सोलर यंत्रणा बसविल्यास सरकारकडून सदर रक्कमेच्या 40 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात मिळते .यामुळे सोलर पॅनल बसविणे जास्त खर्चिक बाब वाटणार नाही .

सोलर रुफटॉप योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिंकाना विजबिलांपासून संरक्षण मिळवे . तसेच अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर करुन , पारंपारिक उर्जा संसाधनावरील काही अंशी ताण कमी करण्यात येईल . तसेच सौर उर्जा मधून विज निर्मितीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याने , अधिक सोयीची असल्याने अधिक लाभ दायक असणार आहे .

योजनेचा लाभ कसा घ्‍याल : या योजनेच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी solarrooftop.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्या आणि त्यामध्ये Apply  फॉर सोलर रुफटॉप हा पर्याय निवडावा , त्यानंतर सविस्तर माहिती फिलअप करुन योजनेचा लाभ घेवू शकता .

या योजना अंतर्गत सध्या वीजबिलाचे वाढते युनिटचे दर यापासून संरक्षण मिळणार आहे .म्हणून सोलर पॅनल आपल्या छतावरती लावून कायमची विजबीलाची चिंता मिटवू शकता ..

Leave a Comment