Spread the love

Solar Generator For Home : अलीकडे कायमच लोकांना विजेची समस्या भासते. सध्या तर उन्हाळा सुरू असल्यामुळे विजेचा जास्त वापर होतो. उन्हाळ्यात तापमान 40° च्या वर गेले आणि अशावेळी घरातील लाईट गेली तर नागरिकांना घरामध्ये बसू वाटत नाही. कारण पंखा, एसी बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त होतात. तुमच्या घरामध्ये एक उत्तम सोलर जनरेटर बसवा ज्या माध्यमातून तुम्हाला विजेची ही समस्या राहणार नाही आणि पाहिजे तेव्हा तुम्ही लाईट चालू करू शकाल.

विशेष बाब म्हणजे सोलर जनरेटर च्या माध्यमातून तुम्ही तुमचा पंखा, लॅपटॉप यासोबतच इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवू शकता. यासोबतच हे सोलर जनरेटर मी सहजपणे इकडून तिकडे नेऊ शकता.

तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेले असाल तर त्या ठिकाणी देखील हा सोलर जनरेटर घेऊन जाता येतो. ज्या ठिकाणी तुम्हाला विजेची समस्या आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता आणि तेही अगदी फ्री मध्ये वीज चालू शकता. तुम्हाला जर या सोलर जनरेटर विषयी तपशील वर माहिती जाणून घ्यायची असेल तर आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचन.

सोलर जनरेटरची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे : आपल्या घरासाठी जर आपण या सोलर जनरेटरच्या फायद्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचे झाले तर आपण घरोघरी हा सोलर जनरेटर अगदी सहजरित्या वापरू शकतो. यासोबतच आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर त्या ठिकाणी हा सोलर जनरेटर आपण सहज घेऊन जाऊ शकतो. अशावेळी प्राथमिक विजेच्या स्त्रोत म्हणून सोलार जनरेटर काम करतो.

सौर जनरेटरची ( Solar generator ) किंमत आणि हमी : फक्त सहा किलो वजन असलेले आणि तब्बल 60 हजार एम ए एच एक क्षमता असलेले शक्तिशाली सोलर जनरेटर यामध्ये लिथियम बॅटरी सुद्धा येते. हे एक उत्कृष्ट उपकरण असून बारा वोल्ट पर्यंत आपल्याला सहज वीज मिळवता येते. जर तुम्हाला हे जनरेटर हवे असेल तर अशावेळी चार्ज करून तुम्ही कुठेही नेऊ शकता आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही वापरू शकता.

या सौर जनरेटर च्या किमती बद्दल बोलायचे झाले तर ॲमेझॉन वर याची किंमत फक्त 52 हजार रुपये आहे. याशिवाय तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर त्यावर तुम्हाला सूट भेटेल वॉरिटी बद्दल बोलायचे झाले तर एक वर्षाची वॉरंटी आपल्याला यावर मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *