Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soil Health Card info ] : केंद्र शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही माती परीक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे , या योजनांच्या माध्यमातुन शेतीतील मातीचे परीक्षण करुन , मातींमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचे पीक अधिक येईल , कोणत्या घटकांची कमतरता आहे , याबाबत माहिती दिली जाते .

साधारणपणे शेतकऱ्यांनी मे महिन्यांमध्ये शेवटच्या आठवड्यांमध्ये म्हणजेच खरीब हंगाम सुरु होण्याच्या अगोदर माती परीक्षण करुन घेणे आवश्यक आहे . माती परीक्षणानंतर केंद्र सरकारकडून सॉईल हेल्थ कार्ड दिले जाते . आपणांस मातीमध्ये कोणते घटक आहेत , याबाबत माहिती नसते , यामुळे माती परीक्षणातुन मातीतील कोणकोणते घटक आहेत याबाबत माहीती मिळते , तर कोणत्या घटकांची आवश्यक आहे , ते घटक ( खत ) मातींमध्ये पिकांसोबत टाकता येते .

जेणेकरुन मातीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे , फक्त तेच घटक खतामार्फत टाकता येईल . यामुळे पिकांची चांगली वाढ होण्यास मदत होते . यामुळे प्रत्येक वर्षी आपणांस मृदा परिक्षण करणे अधिक लाभदायक ठरेल .

मृदा परीक्षण कसे करावे ? मृदा परीक्षण करण्यासाठी सरकारच्या अधिकृत्त https://soilhealth.dac.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देवून स्वत : ची नोंदणी करावी , नोंदणी केल्यानंतर मृदा परीक्षण करीता सविस्तर आवेदन करावेत , यांमध्ये शेतकरी आपल्या मातीच्या नमुन्यांनुसार स्थिती तपासून सॉईल हेल्थ कार्ड बनवू शकता , व ते कार्ड प्रिंट देखिल करु शकता ..

आवश्यक कागदपत्रे : सदर सॉईल हेल्थ कार्ड साठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड ,उत्पन्नाचे प्रमाणपत्र , रहिवाशी दाखला , मोबईल , ईमेल इ.कागदपत्राची आवश्यक लागेल . अधिक माहितीकरीता वरील नमुद संकेतस्थळाला भेट द्या ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *