Spread the love

Live marathipepar , sanhita Pawar [da hike new ] : सध्या दसरा तसेच दिवाळी असे महत्त्वाचे सण काही दिवसांमध्ये येणार आहेत. त्यामुळे सगळीकडे अगदी प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. या उत्साही तसेच प्रसन्नमय वातावरणामध्येच केंद्र अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकार महागाई भत्ता तसेच महागाई भत्त्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती याबाबत मोठी घोषणा जाहीर करणार आहेत. त्यामुळे लवकरच अशा नागरिकांना मोठी खुशखबर मिळण्याची दाट शक्यता आहे.

मागील कित्येक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांना महागाई भत्त्याच्या वाढीचे प्रतीक्षा लागली असून, केंद्र सरकार लवकरच याविषयी कॅबिनेट बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढीस मंजुरी देईल. अशी दाट शक्यता दिसत आहे (da latest news today 2023). आपल्याला याविषयी माहीतच आहे की, सध्या शासकीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आता चार टक्क्यांची वाढ होईल असे सर्वांनाच अपेक्षित आहे.

जर चार टक्क्यांची वाढ केंद्र सरकारने मंजूर केली तर शासकीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के इतका भत्ता मिळणार आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे महागाई भत्त्यामधील वाढ या ठिकाणी एक जुलै 2023 पासून संपूर्ण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल (da in salary). यासोबतच जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांमधील जी काही महागाई भत्त्याची थकबाकी बाकी राहिली असेल ती सुद्धा दिली जाईल. अशी दाट शक्यता दिसत आहे.

अशाप्रकारे महागाई भत्यात होईल 4.24 टक्क्यांची वाढ : एआयसीपीआय- आयडब्ल्यू च्या माध्यमातून मागील बारा महिन्यांची आपण जर सविस्तरपणे सरासरी बघितली तर 382 इतकी असून यामध्ये सूत्राप्रमाणे विचार केला तर एकूण महागाई भत्ता हा 46.24% इतका असण्याची शक्यता दिसत आहे (da in tax). परंतु सध्याचा महागाई भत्ता हा एकूण 42% इतका आहे. अशा परिस्थितीमध्ये 4.24 टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता चांगलाच वाढेल.

जर आपण याविषयी बघायचे झाले तर महागाई भत्त्याची मोजणी दशांश मध्ये केली जात नाही. म्हणजेच चार टक्क्यांनी महागाई भत्तेमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे किंवा चार टक्क्यांच्या वाढीसह हा महागाई भत्ता दिला जाईल अशी दाट शक्यता दिसत आहे. या महागाई भत्त्याच्या वाढीचा फायदा या ठिकाणी हाच आहे की, एक कोटींपेक्षा जास्त या ठिकाणी केंद्र सरकार अंतर्गत काम करणारे शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारक नागरिक यांना याचा लाभ मिळणार आहे.

ऑक्टोबरच्या पगारात मिळू शकतील हे सर्व लाभ : सातव्या वेतन आयोग अंतर्गत वेतन तसेच इतर भत्ते मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक नागरिकांना महागाई भत्ता या सोबतच महागाई सवलत इत्यादी या ठिकाणी पेमेंट ऑक्टोबरच्या अखेरीस दिले जाईल. अशी दाट शक्यता दिसत आहे. कर्मचारी यांच्या ऑक्टोबरच्या पगारांमध्ये हे सर्व वाढीव भत्ते जोडले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इतकेच नव्हे तर या पेमेंटला एकूण तीन महिन्याचे थकबाकी सुद्धा जोडली तर चांगलेच पेमेंट या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अशी शक्यता सुद्धा दिसत आहे. त्याचवेळी पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये सुद्धा चार टक्क्यांची अतिरिक्त पेमेंट जोडले जाईल आणि या सोबतच ऑक्टोबर अखेरीस हे संपूर्ण पेमेंट केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारक नागरिकांना मिळेल. अशी दाट शक्यता तज्ञ लोकांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *