Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Smart meter Installation ] : राज्यांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरु आहे , स्मार्ट मीटरमुळे बिजबिलांवर नियंत्रण येणार असून , महावितरण कंपनीमार्फत प्रिप्रेड ( स्मार्ट ) मीटर धारकांना विजबिलांमध्ये 2 टक्के पर्यंत सवलत उपलब्ध करुन दिली जाणार आहे .

स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हे शहरी भागांमध्ये झपाट्याने सुरु आहे , स्मार्ट मीटरला सुरुवातील लोकांचा विरोध होता , परंतु महाविरण मार्फत स्मार्ट मीटरला देण्यात येणार सुविधा पाहुन विरोध मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे . राज्यांमध्ये पुणे , नागपुर , मुंबई ,छत्रपती संभाजीनगर , नाशिक अमरावती अशा मोठ्या शहरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम शेवटच्या टप्यात आहे , शहरी भागांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम झाल्याच्या नंतर ग्रामीण भागांमध्ये स्मार्ट बसविण्यात येणार आहेत .

स्मार्ट मीटर संकल्पना नेमकी काय आहे ? : आपण ज्याप्रमाणे मोबाईलला रिचार्ज करुन प्रीपेड साठी वापर करतो , त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर हे प्रीपेड असणार आहे , वीजेचा सुविधा अखंडित ठेवण्यासाठी प्रथम रिचार्ज करावा लागणार आहे , म्हणजेच आपल्याला स्मार्ट मीटर मध्ये जेवढी रक्कम शिल्लक आहे , त्याप्रमाणे वीजेचा वापर करता येईल .

स्मार्ट मीटरमधील रिचार्ज संपल्याच्यानंतर आपणांस 2 दिवस अगोदर रिमांइड येईल , कि आपले बॅलेन्स हे कमी आहे , त्वरीत रिचार्ज करा , असा आपल्या मोबाईलवर एसएमएस देखिल येईल . यामुळे ग्राहकांना रिचार्ज करण्यास सोयीस्कर जाणार आहे . वीजेचा पुरवठा हा रिचार्ज संपल्याच्या नंतर वीज खंडीत होईल , परंतु अचानकपणे वीज खंडीत होणार नाही असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे .

आपले पैसे जर सायंकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेमध्ये रिचार्ज संपल्यास वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही , याकरीता काही अवधी दिला जाईल , व ज्यावेळी रिचार्ज केला जाईल त्यावेळी सदर वापर झालेला विजेचे पैसे वजा करण्यात येईल .

वीजबिलांमध्ये सवलत : आपण जर एकाच वेळेस 1000/- रुपये , 5000/- रुपये  10,000/- रुपये अशा प्रकारचे स्मार्ट मीटरंमध्ये रिचार्ज केल्यास , आपणांस अतिरिक्त रिजार्च मिळेल , ज्याचे प्रमाण 2 टक्के पर्यंत सवलत दिली जाईल , तर यापुढे आपल्या मोबाईल मध्ये लोन घेण्याची सुविधा देण्यात आलेली आहे , त्याप्रमाणात स्मार्ट मीटरसाठी देखिल कर्ज सुविधा घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *