लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : 350 वा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्र व्यवहारावर बोधचिन्ह वापरण्यासंदर्भात राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मार्फत दिनांक 24 जुलै 2023 रोजी महत्वपुर्ण ( IMP ) शासन निर्णय निर्गमित आला आहे .
“350 वा शिवराज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे (mangal logo) त्याचबरोबर महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे (logo ) लोकार्पण केले आहे , सदर निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे ,तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा यामागील उद्देश आहे .

त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार/ प्रसिद्धीत तसेच शासकीय पत्र व्यवहारात सदर बोधचिन्हाचा वापर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार आता “350 व्या शिवराज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगलचिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या शासन निर्णयामध्ये सुनिश्चित केलेल्या विशेष बोधचिन्हाचा शासनाच्या सर्व शासकीय कार्यक्रमाच्या प्रचार / प्रसिद्धीत त्याचबरोबर शासकीय पत्र व्यवहारात कटाक्षाने वापर करण्यात यावा .
तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात सदर बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे , सर्व मंत्रालयीन / प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना सदर बाब निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना प्रसारित कराव्यात असे सुचित करण्यात आली आहे ..

- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !