Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ shevaga lagawad farming ] : आपण जर शेतीमध्ये शेवगा लागवड करुन अधिक नफा मिळवू शकत असाल , शेवगाच्या काही प्रजातींची लागवड करुन मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवू शकता . या प्रजातींबाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेवूयात ..
शेवगा हे आपल्या शरीरासाठी सर्वात पोषक असून , आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा समावेश करण्यात येते . यामुळे शेवग्यास देशांमध्ये तसेच इतर देशांमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात मागणी आहे . आपण पालेभाज्या पिकांची लागवड करुन चांगल्या प्रमाणात मोठा नफा कमी जागेत मिळवू शकतो . यापैकीच शेवगा हे जास्त काळ टिकणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे . जे कि वाहतूक दरम्यान लवकर खराब होत नाही .
थार तेजस : थार तेजस या प्रजातीचा शेवगा हा एक सुधारित प्रजात असून , या प्रजातीची लागवड राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते , या प्रजातीच्या शेवग्याची लांबी ही 45 ते 48 से.मी इतकी असते . या जातीच्या शेवग्याचे वैशिष्ट्ये म्हणजे हा शेवगा कोरडवाहू परिस्थितीमध्ये देखिल चांगल्या प्रकारे येते .या जातीस देशांमध्ये मोठी मागणी आहे .
थार वर्षा : शेवग्याची ही जात देखिल सुधारित असून , या जातीच्या शेवग्याला गडद हिरवे पाने येतात . या जातीच्या शेवग्याच्या झाडाला एका वर्षांमध्ये तब्बल 320 पर्यंत शेवग्याच्या शेंगा लागतात . आपण जर एका हेक्टरांमध्ये शेवग्याची लागवड केल्यास , प्रति हेक्टरी 53 ते 54 टन उत्पादन होईल .
शेवग्याच्या शेंग्यास प्रति क्विंटल 2500/- इतका सर्वसाधारण बाजार भाव आहे .