Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Shetmal Taran Loan Scheme ] : शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ मार्फत 1990 पासून शेतकऱ्यांना शेतमालावर तारण कर्ज दिले जाते . यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव कमी असताना , शेतमाल तारण ठेवून कर्ज घेवून आपली आर्थिक अडचण भागवू शकतो . या योजनेचा फायदा राज्यातील सर्व शेतकरी घेवू शकतात .
ही योजना राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातुन सन 1990 पासून राबविण्यात येते , यांमध्ये घसरत्या बाजारभावांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दुर व्हावी या करीता ह्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे . या योजनेच्या माध्यमातुन शेतकरी आपले शेतमाल बाजार समितीच्या गोदामांमध्ये ठेवल्याने , त्यांस कोणत्याही प्रकारचे गोदामाचे भाडे तसेच देखरेखीचा खर्च किंवा विमा अशा कोणत्याही प्रकारचे खर्च शेतकऱ्यांना भरावा लागत नाही , याची जबाबदारी ही बाजार समितीची असते .
खास वैशिष्ट्ये : शेतमाल तारण कर्ज योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेचे माध्यमातुन शेतमालाच्या चालु असणाऱ्या बाजारभावाच्या 75 टक्के पर्यंत रक्कम कर्ज स्वरुपात दिले जाते . तर या कर्जाचे वार्षिक व्याजदर हे 6 टक्के इतक्या व्याजदराने 6 महिने कालावधीसाठी असेल . तर शेतकऱ्यांने सदरची रक्कम ही सहा महिन्यांच्या आतमध्येच परतफेड केल्यास , बाजार समित्यांकडून 03 टक्क्यांची व्याजांमध्ये सवलत देण्यात येते , म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना फक्त 03 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होते .
तर स्वनिधी नसणाऱ्या बाजार समितन्यांना पणन मंडळांकडून पाच लाख रुपये पर्यंत अग्रिम उपलब्ध करुन देण्यात येते , त्याचबरोबर राज्य वखार महामंडाळाच्या गोदामांमध्ये शेतकऱ्यांचे असणारे शेतमाल याची वखार पावतीवर देखिल शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते .
या पिकांवर दिले जाते , शेतमाल कर्ज : या योजना अंतर्गत तूर , मूग , करडई , ज्वारी , सुर्यफूल , हरभरा , धान , सोयाबीन , उडीद , बाजरी , गहु , मका , बेदाणा , काजू बी , हळद , सुपारी , राजमा या शेतमालाच्या तारणांवर कर्ज दिले जाते .
या योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होते , घसरत्या बाजारभावामध्ये आर्थिक अडचण दुर होते , तर चढत्या बाजारभावांमध्ये शेतमालाची विक्री होत असल्याने , शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होत आहे .