पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 2,109 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता ! आपण पात्र आहात का पाहा सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Crop Nukasan Bharapai Nidhi Vatap ] : मागील वर्षी राज्यात माहे नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्य शेत पिकांच्या नुकसान करीता शेतकऱ्यांना मदत देणेसाठी 2 हजार 109 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजूरी देण्यात आलेले आहे . या संदर्भात राज्य शासनांकडून अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेले आहे .

यांमध्ये पुर , अतिवृष्टी तसेच चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शत पिकांचे नुकसान झाले असल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरीता शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात एका हंगामात एक वेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहीत दराने मदत देण्यात येते . त्याचबरोबर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरीता देखिल विहीत दराने मदत देण्यात येत असते ,

मात्र माहे नोव्हेंबर व डिसेंबर  2023 मधील अवेळी पाऊस व गारपीठ यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीठ व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरीता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे . या बाबतची अधिकृत मदतीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशात केली होती .

जिल्हा निहाय बाधित क्षेत्र ( हेक्टर मध्ये ) व बाधित शेतकरी संख्या व वितरीत करण्यात आलेले निधी ( रुपये लाखात ) पुढील चार्टप्रमाणे नमुद आहेत .

Leave a Comment