Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Namo Shetakari Mahasanman nidhi Yojana ] : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत तिसरा हप्त्याचे वितरण राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना करणेबाबत निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत . या संदर्भात कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांमध्ये भर घालणारी योजना असून , सदर योजना अंतर्गत राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्रमाणे प्रतिवर्षी 6,000/- रुपये याप्रमाणे निधी वितरीत करण्यात येते . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000/- इतकी रक्कम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या माध्यमातुन मिळते . या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसरा हप्ता अदा करण्यासाठी 1792/- कोटी रुपये इतका निधी वितरण करण्यास यापुर्वीच मान्यता दिलेली आहे .
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत तिसरा हप्ता ( माहे डिसेंबर ते माहे मार्च ) लाभार्थी शेतकऱ्यांना अदा करण्याकरीता 2,000 /- कोटी रुपये इतक्या निधीचे वितरण करण्यास राज्य शासनांची मान्यता देण्यात येत आहे . सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि सदरचा प्रस्तुत खर्च हा पीक संवर्धन , लहान / सीमान्त शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना , अर्थसहाय्य योजना या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर प्रस्तुत योजनाच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त ( कृषी ) यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा – 1 यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहेत . सदर निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त ( कृषी ) शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .