निवडणुकीपुर्वीच राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.09.10.2024 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण निर्णय ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ shasan nirnay about state employee dated 09 October ] : पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणूका संपन्न होणार आहेत , त्या अनुषंगाने राज्यात पुढील 2-3 दिवसात केव्हांही आचारसंहिता लागु शकतील . यामुळे राज्य शासनांकडून तातडीने विविध निर्णय घेतले जात आहेत . यांमध्ये काल दिनांक 09.10.2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 04 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

निवडणुकांच्या अनुषंगाने बदल्या : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने आवश्यक पदे भरण्याकरीता , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 मधील कलम 4 ( 4 ) व 4 ( 5 ) मधील तरतुदीनुसार नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे . बदली अधिकाऱ्यांची यादी खाली नमुद शासन निर्णयांमध्ये करण्यात आलेली आहे .

महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल : महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमधील महिला अधिकारी / अंमलदार यांना गर्भधारणा झाल्याच्यानंतर पहिल्या महिन्यांपासून कर्तव्य असताना साडी वापरताना मुभा देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे . तसेच त्याकरीता महिला पोलिस अधिकारी / अंमलदार यांना संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्या गर्भधारणा असल्याबाबत , वै.प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल .

होमगा्र्ड दलातील स्वयंसेवकांच्या विविध भत्यांमध्ये वाढ : राज्यांमधील होमगार्ड दलातील स्वयंसेवकांच्या विविध भत्यांमध्ये वाढ करणेबाबबत दि.30.09.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे . सदरचे सुधारित भत्याचे दर दि.01.10.2024 पासून लागु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .सदर निर्णयानुसार होमगार्ड दलातील स्वयंसेवकांना देण्यात येणारे सुधारित दर पुढीलप्रमाणे आहेत .

भत्त्याचे प्रकारसध्याचे दरसुधारित दर
कर्तव्यभत्ता570/- (प्रतिदिन )1083/- प्रतिदिन
उपहार भत्ता100/-200/-
कवायत भत्ता90/-180/-
खिसा भत्ता35/-100/-
भोजन भत्ता100/-250/-

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अनुदान वितरण : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठास सन 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये 31 सहाय्यक अनुदाने ( वेतनेत्तर ) करीता अनुदान वितरीत करणेबाबत , कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 09.10.2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

या संदर्भातील चारही शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment