Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta ward cabinet nirnay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे , संदर्भातील निर्णय नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे .
प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA ) दिनांक 01 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून , सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजुरीकरिता पाठवण्यात आला आहे .
सदर प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 01 जुलै 2024 पासून 3 टक्के महागाई भत्ता (DA ) फरकासह लागू करण्यात येणार आहे . सदरचा निर्णय माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे .
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ दिला जाईल . तर पेन्शनधारकांना देखिल फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन देयका सोबत सदर वाढीव महागाई भत्ता (DA) व फरकाची रक्कम दिली जाईल .
राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची पहिली बैठक माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून , यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर DA वाढीचा प्रलंबित निर्णय मार्गी लावण्यात येणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.