Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ share market reduce in future at 3000 pt. see reason ] : भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे , तर आणखीन 3000 अंकाची घसरण होण्याचा अंदाज तज्ञांकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . या मागची नेमकी कारणे कोणती आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

मागील महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरुच आहे , अशातच काल दि.04.11.2024 रोजी आणखीन मोठी घसरण पाहायला मिळाली , यांमध्ये सेन्सेक्स 1500 अंकानी घसरुन 78,233 चा निचांकी पातळी गाठली आहे . तर तज्ञांचे मते सेन्सेक्समध्ये आणखीन मोठी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

सेन्सेक्स अजून 72,000 अंकापर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . यामुळे यावर्षीची सर्व तेजी संपुष्टात येईल .सध्या सेन्सेक्सला 78120 अंकावर सपोर्ट मिळू शकतो . परंतु 72200 चा सपोर्ट तुटल्यास ,यांमध्ये तब्बल 75900 अंकापर्यंत घसरण होवू शकते . जर सपोर्ट नाही तुटल्यास सेन्सेक्स 80,000 अंकापर्यंत पोहोचू शकते .

तर निफ्टी 20,850 अंकापर्यंत घसरण्याचा अंदाज आहे , तर यांमध्ये बाऊन्स बॅक झाल्यास , निफ्टी 24675 अंकावर स्थिर होईल . परंतु तज्ञांचे मते माहे नोव्हेंबर मध्ये देखिल बाजारातील घसरण कायम राहणार आहे . याचे प्रमुख कारणे काय आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याचे बरेच कारणे आहेत , यापैकी पश्चिम आशियामध्ये वाढता भू- राजकीय तणाव तसेच जागतिक मध्यवर्ती बँकांच्या धोरणात्मक कृती व देशांतर्गत कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमी तिमाही निकाल तसेच अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूकीचा निकालांवरील अनिश्चितता , यामुळे गुंतवणूक दारांमध्ये चिंता वाढत असल्यने , बाजारात घसरण होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *