Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Share Market News ] शेअर मार्केट मध्ये मागील तीन दिवसांपासून मोठी घसरण होत असून , या घसरणीच्या कालावधीमध्ये , आपणांस गुंतवणुकीची मोठी संधी असणार आहे . कारण मार्केट तेजीच्या कालावधीमध्ये गुंतवणुक केल्यास आपणांस कमी परतावा मिळाला असता , यामुळे जे मार्केट मध्ये गुंतवणुक करु इच्छित आहेत . अशांना गुंतवणुकीची एक प्रकारची संधीच उपलब्ध झालेली आहे .
या आठवड्यांमध्ये NIFTY 50 : 21,294 पर्यंत खाली घसरला होता . यामुळे NIFTY 50 मधील शेअर मध्ये गुंतवणुक असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागला . यामध्ये भागभांडवलाच्या बाबतीत टॉप असणारी रिलायन्स कंपनीचे शेअर हे 1.17 पर्यंत खाली उतरले होते , यामुळे यांमध्ये 100/- रुपयांची घसरण दिसून आली . त्यानंतर या शेअरने काल दिनांक 20 जानेवारी रोजी 0.80 टक्यांनी घसरणीस बंद झाला .
तर टीसीएस कंपनीचे शेअर देखिल 2.09 टक्के पर्यंत घसरले आहेत . तसेच भारती एअरटेल 0.11 टक्के पर्यंत खाली घसरले , इन्फोसिस शेअर 0.62 टक्के पर्यंत घसरले .डॉ.रेड्डी लॅब शेअर 0.58 टक्क्यांनी घसरले आहेत .तर यांमध्ये बँकिंग शेअरने काल मोठी Recovery केली आहे .
यांमध्ये टॉप घसरण झालेल्या मोठ्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान उनिलिव्हर चे शेअर 3.76 टक्क्यांनी घसरले , तर बजात होल्डींग आणि इन्वेस्टमेंट चे शेअर 2.49 टक्क्यांनी घसरले .तर मिड शेअर मध्ये Voltas चे शेअर 2.53 टक्क्यांनी घसरले तर Laurus Labs चे शेअर हे 2.51 टक्क्यांनी घसरले . तर स्मॉल कॅप शेअर मध्ये CESC कंपनीचे शेअर हे 3.93 टक्क्यांनी घसरले तर Aegis Logistics कंपनीचे शेअर हे 3.38 टक्क्यांनी घसरले .
काल दिनांक शनिवारी शेअर मार्केट सुरु ठेवण्यात आलेले होते , कारण सोमवारी श्रीराम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त सार्वजनिक सुट्टी शेअर मार्केट ला देखिल देण्यात आल्याने काल दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर मार्केट सुरु ठेवण्यात आलेले होते . आता दिनांक 01 फेब्रुवारी रोजी देशाचे अर्थसंकल्प जाहीर होणार आहेत . यांमध्ये होणाऱ्या नविन आर्थिक घडामोडीमुळे अनेक शेअर मध्ये मोठी घसरण / वाढ होईल यामुळे आपणांस गुंतवणुक करायची असल्यास , या कालावधीमध्ये गुंतवणुक करु शकता ..तसेच सध्या घसरलेल्या टॉप कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुक करण्याची मोठी संधी आहे , कंपनीचे भागभांडवल पाहून आपण त्यांमध्ये गुंतवणूक करु शकता ..