Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ share market investment see detail share ] : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे तज्ञांकडून सल्ला देण्यात आला आहे , कारण सध्यस्थितीमध्ये शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात निच्चांकी पातळीवर शेअरच्या किंमती गेल्या आहेत .
तरी ट्रेडींगच्या नियमानुसार , शेअरच्या किंमती कमी झाल्यास , सदर शेअर मध्ये गुंतवणुक करणे अधिक फायदेशिर ठरते .सध्य स्थितीत सरकारी कंपन्यांचे शेअरच्या किंमतीने निच्चांकी गाठली आहे , अशा शेअरमध्ये गुंतवणुक करणे अधिक फायदेशिर ठरणार आहेत . असे कोणकोणते शेअर आहेत . ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये NHPC हि सरकारी उत्पादन कंपनी आहे , ज्याची शुक्रवारच्या दिवशीची क्लोजिंग किंमत ही 94.65/- रुपये आहे , ज्याची कमाल किंमत 118.40/- रुपये इतकी आहे .दुसरा शेअर म्हणजे IRB ही कंपनी रोडवेज बनविण्याचे कामकाज करीत असते , ज्याची सध्याची किंमत ही 63.08 अशी आहे , सदर शेअरची कमाल किंमत ही 78.15/- रुपये अशी आहे , ज्याचे टार्गेट 100 /- पेक्षा अधिक असल्याचे तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहेत .
या शिवाय ONGC या शेअरमध्ये गुंतवणुक करणे अधिक फायदेशिर ठरेल ,कारण या शेअरने 345/- रुपये पासुन परत 286.25/- रुपये पर्यंत निच्चांकी गाठली आहे . यामुळे या शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
IRFC : हा शेअर भारतीय रेल्वेच्या विविध प्रकल्पांना फायनान्स करणारा शेअर आहे , सदर शेअरची किंमत 229.00/- रुपयांपासुन 161.43/- रुपये पर्यंत किंमत घसरली आहे .हा शेअर भविष्यात मल्टीबॅगर ठरु शकणार असल्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे .
LIC : या शिवाय भारतीय आयुर्विमा महामंडळच्या शेअरमध्ये गुंतवणुक करण्याची संधी आहे , या शेअरची किंमत ही 1222/-वरुन 1010/- अशी खाली घसरली आहे .
सल्ला : ( सदरची गुंतवणूक बाबतची माहिती तज्ञांकडून दिलेल्या सल्ल्यानुसार देण्यात आली असून गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला घ्यावा , कारण शेअर बाजारामधील किमतीमध्ये झपाट्याने बदल होऊ शकतो )