सेवाखंड नंतरची वेतननिश्चिती , वेतनश्रेणीतील बदल , कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य कालावधी संदर्भातील सविस्तर नियमावली !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Service Khand , Pay Scale Change rules ] : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवाखंडानंतरची वेतननिश्चिती त्याचबरोबर वेतनश्रेणीतील बदल , तसेच कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य कालावधी या संदर्भातील सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सेवाखंडानंतरची वेतननिश्चिती : यांमध्ये शासकीय सेवेत असताना , कर्मचाऱ्यांना सेवेत खंड पडला असत्यास आणि सदर कर्मचाऱ्यांस परत नियुक्ती केल्यावर वेतनश्रेणीच्या किमान टप्यावर वेतन आहरीत करण्यात येते . तर खंड हे सक्षम अधिकाऱ्यांकडून क्षमापित केल्यास , खंडापुर्वीचे वेतन त्यास नव्यान नेमणूक केल्यानंतर देय ठरते . तर सेवाखंड कालावाधीची गणना करुनच वेतनवाढी पुढे देण्यात येतात .

कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य कालावधी : यांमध्ये राज्यातील बडे अधिकारी उदा . पोलिस अधिकारी , शासनाचे सचिव , मंत्र्यांचे सचिव यांच्या व्यतिरिक्त इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जर त्यांच्या कामाच्या ठिकाणाबाहेर शासकीय कामकाज ( कर्तव्य ) करण्याकरीता जावे लागत असल्यास , सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगी घेतल्याशिवाय सदर कर्मचाऱ्यांस त्या कालावधीमधील वेतन / भत्ते अनुज्ञेय लागु होणार नाहीत .

वेतनश्रेणीमधील बदल : जर शासनांकडून एखाद्या पदांची वेतनश्रेणी मध्ये सुधारणा ( उंचाविण्याचा ) निर्णय घेतला असेल , त्याच दिवशी जर कर्मचाऱ्यांची बदली झाल्यास , सदर कर्मचाऱ्यांस सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येते . यांमध्ये वेतननिश्चितीची टप्पावर निश्चिती होत असल्यास , टप्यावर अथवा पुढील टप्यावर वेतन निश्चिती करण्यात येईल .

तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांची बढती झाल्यानंतर वेतन निश्चिती जर चुकीची झाली असल्यास सदर कर्मचाऱ्यांस अतिप्रदान झाल्यास वेतन निश्चिती नियमित करण्याचा अधिकार सक्षम अधिकाऱ्यास असतो .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment