Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ service book record info] : कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन प्राप्ती करिता सेवा पुस्तक पडताळणी केली जाते , यामध्ये काही त्रुटी आढळल्यास , सदर कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच निवृत्तीनंतरचे लाभ दिले जात नाहीत . याकरिता कोणकोणत्या बाबी सेवा पुस्तकांमध्ये आवश्यक आहेत , ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .
यामध्ये कर्मचाऱ्याचे प्रथम नियुक्तीची नोंद सेवा , पुस्तकाच्या पहिल्या पानावरील नोंद, जात पडताळणी बाबतची नोंद, शैक्षणिक अहर्ता बाबतची नोंद , चारित्र्य पडताळणी बाबतची नोंद, वैद्यकीय तपासणी बाबतची नोंद ,हिंदी /मराठी भाषा सूट बाबतची नोंद , स्वग्राम घोषित केल्याची नोंद , परीविक्षाधिन कालावधी पूर्ण केल्याची नोंद , कायमपणाचे फायदे प्रमाणपत्र नोंद, मृत्यू आणि सेवा उपदानचे प्रपत्र , गट विमा योजना सदस्यत्वाची नोंद कुटुंबाच्या तपशिलाचे प्रमाणपत्र ..
संगणक परीक्षा उत्तीर्ण बाबतची नोंद, विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद , पदोन्नती नाकारली असल्यास त्याची नोंद , पदोन्नती झाली असल्यास त्याबाबतची नोंद , भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आलेल्या थकबाकीची नोंद , गट विमा योजनेची वाढीव रकमेची वसुलीची नोंद , वयाने 50 वर्ष पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण परीक्षा पासून देण्यात आलेली सूट , वेतन निश्चिती बाबतची नोंद सुधारित नोंद , सुधारित वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या वेतन निश्चिती बाबतच्या नोंदी , आश्वासित प्रगती योजना अंतर्गत मिळालेल्या पहिला / दुसरा / तिसरा लाभाची नोंद ..
वेतनवाढी बाबतची नोंद , असाधारण रजा बाबतची नोंद , कर्मचाऱ्यांना मंजूर झालेल्या कर्ज अग्रीम या संदर्भातील नोंद , एकस्तर वेतन निश्चिती बाबतची नोंद ( आवश्यकतेनुसार ) , वेतन पडताळणी कडून सेवा पुस्तक पडताळणी करण्यात आल्या बाबतची नोंद , पदोन्नती कालबद्ध पदोन्नतीसाठी विकल्प , विविध वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीचे विकल्प जोडले आहेत किंवा नाही याबाबतची नोंद , निलंबन कालावधी कशाप्रकारे नियमित केला याबाबतची नोंद , अतिप्रदान झालेल्या रकमेच्या वसुलीची नोंद ..
- विभागीय चौकशी अंति झालेली शिक्षेची अंमलबजावणीची नोंद .
- दक्षता रोध मंजूर केल्याची नोंद .
- सेवा पुस्तकातील रकणा क्रमांक 01 ते 08 परिपूर्ण करून क्रमांक 09 मध्ये सक्षम अधिकारी यांच्याकडून साक्षांकित केल्याची नोंद ..
- शासकीय कारणास्तव वेतनवाढी रोखण्यात आल्याची नोंद तसेच रोखण्यात आलेल्या वेतनवाढी मुक्त केल्याची नोंद .
- कुंठीत वेतनवाढी मंजुरीची नोंद , आगाउ वेतनवाढीची मंजूर केली असल्यास त्याची नोंद .
- पदावनत झाले असल्यास त्या बाबाची नोंद ..
- बदलीने रुजू , कार्यमुक्त बाबतची नोंदी ..
- जमा झालेल्या तसेच घेण्यात आलेल्या अर्जित रजेच्या नोंदी तसेच वैद्यकीय रजेच्या नोंदी त्याचबरोबर रजा प्रवास सवलत घेतल्याची नोंदी .
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1978 / 1988 / 1998/ 2009/ 2019 नुसार वेतन निश्चितीच्या प्रती जोडले आहेत की नाही , सेवेत कार्यरत असताना घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाची नोंदी .