Spread the love

Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ September paid in October payment anudan shasan nirnay gr ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतन देयकासाठी अनुदान वाटप करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदाचा निधी हा नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त – क्रिडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सह सचिव / उप सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय , मुंबई यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विराधीन होती .

सदरच्या निर्णयानुसार , सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण तसेच क्रिडा विभाग मार्फत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तसेच वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीद्वारे प्राप्त करुन दिलेल्या निधी हा शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या लेखाशिर्ष निहाय निधीचे वितरण करण्यात आले आहेत .

यांमध्ये नगरपालिका शाळा / जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , शाळा तपासणी , सर्वसाधारण शिक्षण तसेच जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 याच्या कलम 182 नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण , अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने , जिल्हा परिषदांमधील आस्थापना अनुदाने , पालिका प्रशासनास अनुदाने , सैनिकी शाळांना अनुदाने अशा विविध नमुद लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहेत .

सदर निधी खर्च करताना राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , तसेच सदर निधी ज्या लेखा शिर्ष करीता वितरीत करण्यात आलेला आहे , त्याच लेखाशिर्षाकरीता खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच सदरचे निधी वितरीत करीत असताना , सदर निधी खर्च करण्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल . असे नमुद करण्यात आलेले आहेत , सदर निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग मार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्‍टोंबर महिन्यांचे वेतन वेळेत होण्यास सहाय्य होणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *