Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ school timing change paripatrak publish ] : जिल्हा परिषद शाळेच्या सकाळच्या शाळेची वेळ बदलणे संदर्भात शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद ,अलिबाग यांच्यामार्फत दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 08 फेब्रुवारी 2024 तसेच मा. शिक्षण संचालक यांच्या दिनांक 20 जानेवारी 2024 रोजीच्या सूचना तसेच प्राथमिक शिक्षण संघटनेच्या बैठक दिनांक 08 ऑक्टोबर 2024 च्या संदर्भानुसार , सकाळी 9:00 पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9:00 किंवा 9:00 नंतर भरवण्याबाबत निर्देश जारी केलेले आहेत .

त्याचबरोबर माननीय संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राज्यातील शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंत वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याबाबत सूचना दिलेले आहेत,  त्याचबरोबर जिल्हा परिषद रायगड अलिबाग कार्याकडून निर्गमित केलेल्या पत्रानुसार शनिवार व इतर सकाळच्या शाळेच्या दिवशी शाळेची वेळ सकाळी 07:00 ते 11:30 अशी करण्यात आली होती .

परंतु राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 08 फेब्रुवारी 2024 व माननीय संचालक प्राथमिक यांच्यामार्फत दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या सूचना व पत्रानुसार शनिवार व इतर सकाळच्या शाळेची वेळ सकाळी 09 ते दुपारी 1:30 अशी करण्यात आली होती .

परंतु शिक्षक संघटनेच्या मागणीनुसार जिल्हा परिषद रायगड अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांची शनिवार व इतर सकाळच्या शाळेची वेळ सकाळी 7:30 ते 11:00 अशी करण्यात येत आहे . त्याचबरोबर बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार नियम 2009 नुसार अध्यापनाच्या तासिका कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाहीत , याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांची राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे . सदरचा निर्णय रायगड जिल्हा व्यवस्थापनाच्या अधिनस्त सर्व प्राथमिक शाळांना लागू राहणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *