Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ School Sudharit Rules Shasan Nirnay ] : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , शासकीय , खाजगी , अनुदानित , अंशत अनुदानित इ.सर्व . नविन शाळा सुरु करणे , वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहीत करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वरील नमुद शासन निर्णयानुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदी विचारात घेवून राज्यातील प्राथमिक ,उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे , एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास , शिक्षक पदे मंजूर करणे इ. बाबीचे निकष हे पूढीलप्रमाणे पाहू शकता ..

यांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी गटांमध्ये विद्यार्थी संख्येच्या गटाकरीता आरटीईच्या निकषानुसार आवश्यक असणारे 30 विद्यार्थी संख्येच्या निम्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 15+1 = 16 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय असणार आहेत , तर इयत्ता 1 ली ते 5 वी गटांमध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल .

इयत्ता 1 ली ते 5 वी या गटातील 210 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदांची गणना करताना 210 विद्यार्थ्यांपर्यंत 7 शिक्षक व त्यावरील प्रति 40 विद्यार्थी संख्येवर 1 पद देय होणार आहे .

मुख्याध्यापक / उपमुख्याध्यापक / पर्यवेक्षक पदे तसेच विशेष शिक्षक माध्यमिक शाळा पटसंख्यानुसार नमुद करण्यात आलेले आहेत , याबाबत सविस्तर माहीती घेण्यासाठी राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *