Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ school sadil anudan shasan nirnay ] : शाळांना सादिल अनुदान अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत दि.28 नोव्हेंबर 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार , सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत , थकीत वीज देयके , किशोर तसेच जीवन शिक्षण मासिक अंक पुरवठ्यापोटी देय रक्कम अदा करण्यासाठी अनुदान अदा करणेबाबत , मंजूरी देण्यात आलेली आहे .
यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी भौतिक तसेच शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्याकरीता मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या 4 % पर्यंत सादिलवार खर्च करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या माहे जुलै 2024 पर्यंतच्या कालावधीतीली थकीत वीज देयकाची रक्कम तसेच ..
किशार मासिक अंक पुरवठ्याबाबत , माहे एप्रिल 2024 ते माहे जुन 2024 या कालावधीतील देय रक्कम तसेच जीवन शिक्षण मासिक अंक पुरवठ्याबाबत सन 2024-25 या कालावधीतील देय रक्कम अदा करण्यासाठी सादिल अनुदान वितरीत करण्याची बाबत शासनांच्या विचाराधीन होती .
यांमध्ये थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी 11,11,00,000/- ( अक्षरी – अकरा कोटी अकरा लाख रुपये फक्त ) इतका निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांना मंजूर व अदा करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे . तसेच किशोर मासिक पुरवठा करीता 12,33,120/- रुपये (अक्षरी – बारा लाख तेहतीस हजार एकशे वीस रुपये फक्त ) इतका निधी वितरणांस मंजूरी देण्यात आलेली आहे .
तसेच जीवन प्रकाश मासिकाची देय रक्कम 60,13,963/- रुपये इतका निधी वितरणांस मंजुरी देण्यात आलेली आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.