Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ SBIF Asha Scholarship Program 2024 ] : एसबीआयएफ आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 6 वी ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 7.50 लाख रुपये रक्कम दिली जाते , याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सदर शिष्यवृत्ती ही शिक्षणांनुसार दिली जाते . यांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना 15,000/- रुपये , पदवीपुर्व विद्यार्थ्यांसाठी 50,000/- रुपये तर पदव्युत्तर पदवी करीता 70,000/- रुपये तर आयआयटी विद्यार्थ्यांसाठी 2,00,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते . तर आयआयएम विद्यार्थ्यांकरीता 750,000/- रुपये शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते .
पात्रता | शिष्यवृत्ती रक्कम |
6 वी ते 12 वी | 15,000/- |
पदवीपूर्व शिक्षण | 50,000/- |
पदव्युत्तर पदवी | 70,000/- |
आयआयटी | 2,00,000/- |
आयआयएम | 7,50,000/- |
इतर पात्रता : सदर विद्यार्थी हा देशाचा नागरिक तसेच त्यांने चालु वर्षांमध्ये नमुद अभ्यासक्रमांस प्रवेश घेतलेला असला पाहिजे . त्याचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : सदर एसबीआयएफ आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत आवेदन करण्यासाठी Apply Now
अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत ही दिनांक 31 ऑक्टोंबर 2024 अशी असणार आहे . त्यापुर्वी आवेदन सादर करावेत .. सदर शिष्यवृत्ती ही शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जातो .