Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : भारतीय स्टेट बँकेने एक अत्यंत लाभदायक गुंतवणुक योजना सुरु केली आहे , ज्यांमध्ये गुंतवणुकदारांना वयाच्या ठराविक वेळेनंतर ( 58 ते 65 वर्षांनंतर ) प्रतिमहा पगारासारखे पैसे मिळणार आहेत . या साठी योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यावे , याकरीता गुंतवणुक कशी करण्यात यावी , किती रुपये गुंतवणुक करावी लागेल , याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणुन घेवू ..

भारतीय जीवन विमा महामंडळ कडुन एलआयसी सरल पेन्शन योजना सुरु केली आहे , त्याच धर्तीवर आता भारतीय स्टेट बँकेने एसबीआय सरल पेन्शन योजना सुरु केली आहे .या योजनेमध्ये बोनस, कर्जाची सुद्धा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .यासाठी प्रथम आपल्याला लाभ घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचे खातेदार होणे आवश्यक असणार आहे .

स्टेट बँक सरल पेन्शन योजनेचे खास वैशिष्ट्ये :  इतर पेन्शन योजनेपेक्षा या पेन्शन योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर मोठी रक्कम पेन्शन स्वरुपात मिळते .गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर आपल्या एकुण जमा रक्कमेच्या एक तृतियांश रक्कम काढता येईल , या रक्कमेवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स ( आयकर ) भरावा लागणार नाही .शिवाय या योजनाचा लाभ घेण्यासाठी प्रतिमहा आपल्याला किती पेन्शन हवे त्या प्रमाणात गुंववणुक करावी लागणार आहे .

हे पण वाचा : NPS कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा , सन 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension) लागु , वाचा सविस्तर !

सरल व्यक्तीची मृत्यु झाल्यास , सदर पेन्शन लाभ हा त्या व्यक्तीच्या नामनिर्देत / वारस व्यक्तीस मिळत असते .यांमध्ये मिळणार पेन्शन फायदे चांगले असल्याने लोकांचा कल या योजनाकडे अधिकच आकर्षित होताना दिसत आहेत .ही योजना सर्वसमावेशक असून सेवानिवृत्तीनंतर अधिक लाभ दायक असणार आहे .

योजनेचा लाभ कसा घ्याल : या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला स्टेट बँकेत / ग्राहक सेवा केंद्र / एसबीआय एजेंट / यांच्याकडे जावून सदर SBI सरल पेन्शन योजनेचा लाभ घेवू शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *