Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ sattasthapana sangharsh ] : देशांमध्ये लोकसभा निकालानंतर सत्तासंघर्षासाठी इंडिया आघाडीकडून सर्वपरी प्रयत्न केले जात आहेत . कारण भारतीय जनता या एका पक्षाला पुर्ण बहुमत मिळाले नाहीत . यामुळे इंडिया आघाडी सत्ता स्थापनेसाठी एनडीए मधील घटक पक्षांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहेत .

इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारे नितीश कुमार व चंद्राबाबु नायडू हे सत्ता स्थापनेसाठी शीर्षस्थानी असणार आहेत . नितीश कुमार व चंद्रबाबु नायडू हे इंडिया आघाडीच्या बाजुने झुकल्यास निश्चितच इंडिया  आघाडीच्या सत्ता स्थापनेला वेग येई . इंडिया आघाडीचे दिग्गज नेते , नितीश कुमार व चंद्रबाबु नायडू यांच्या संपर्कामध्ये असल्याचे बोलले जात आहेत .

इंडिया आघाडीला 232 जागा मिळाले आहेत , व इंडिया आघाडीला सत्ता स्थापनेसाठी आणखीण 40 जागांची तडजोड करावी लागणार आहे , यांमध्ये नितीश कुमारव चंद्राबाबु नायडू यांच्या घटक पक्ष व काही अपक्ष उमेदवार मिळून सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात .नितीश कुमार हे बाजु पलटण्याची शक्यता आहे .

मंगळवारी बिहारचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते श्री.सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या निवास्थानी भेटीसाठी गेले असता , त्यांनी भेट नाकारल्याने मिडीयांमध्ये नितीश कुमार इंडिया आघाडीच्या वाटेवर असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहेत . तर नितीश कुमार यांच्या पक्षाचे निर्वाचित उमेदवार चिराग पासवान यांची मात्र भेट घेतल्याने  , नितीश कुमार बाजी पलटणार काय की ? असा सवाल उपस्थित होत आहे .

नितीश कुमार हे एनडीएच्या बैठकीला गेले असले , तर मंत्रीपदावर संघर्ष होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत . कारण भारतीय जनता पार्टीला सत्ता टिकविण्यासाठी नितीश कुमार व चंद्राबाबु नायडू यांची आवश्यक राहील .सत्ता स्थापनेपर्यंत भाजपाला धाकधुक कायम असणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *