Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sanch Manyata Court Result ] : संच मान्यता मधील मंजूर असणारे पदे हे पुर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार नसल्याचे , छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा निकाल दिला आहे .यामुळे कर्मचारी हे निवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकणार नाहीत , अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा पुर्वलक्षी प्रभावाने रद्द करता येणार नसल्याचे सदर निकालांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

राज्य शासनांच्या दिनांक 11.02.2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान मान्यतेच्या 2010 सालच्या संच मान्यतामधील मंजूर वर्ग – 4 श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद हे दिनांक 11.02.2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुर्वलक्षी प्रभावाने व्यपगत होणार नाहीत . तर याचिकाकर्ते सेवानिवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकणार असल्याचा मोठा महत्वपुर्ण निकाल छ.संभाजीनगर खंडपीठाच्या न्या.विभा कंकणवाडी व न्या.एस.जी.चपळगावकर यांनी दिलेला आहे .  

अनुदानाची मान्यता असल्याने शासन निर्णयानुसार वर्ग – 4 श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचे पदे ही व्यपगत झाली , त्याऐवजी सदरची पदे ही विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कंत्राट पद्धतीने भत्यावर / मानधन तत्वावर नियुक्ती करण्याची तरतुद आहे . यामुळे लातुर विभागीय शिक्षण मंडळमार्फत याचिकाकर्ता संभा दगडू गोरे ( कनिष्ठ महाविद्यालय मध्ये ) यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या संस्थेच्या प्रस्तावास नकार दिला होता .

त्यामुळे गोरे यांनी छ.संभाजीनगर खंडपीठांमध्ये याचिका दाखल केली होती , या याचिकेवर सुनावणी देताना , श्री.संभा दगडू गोरे सेवानिवृत्त होईपर्यंत सेवेत राहू शकणार असल्याचा महत्वपुर्ण निकाल देण्यात आलेले आहेत . संभा दगडू हे सन 2010 पासून संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दीनदयाळ कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत , त्यांच्या नियुक्तीस शिक्षण उपसंचाल यांनी दि.20.12.2016 रोजी मान्यता देण्यात आलेली होती .

तसेच 2021 मध्ये 10 पदांना 20 टक्के अनुदान मानय्‍ करण्यात आलेले होते , यांमध्ये 03 पदे ही शिक्षकेत्तर कर्मचारी पदांची होती , यांमध्ये एक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद होते , सदर मान्य पदांवर श्री.संभा गोरे कार्यरत होते . यामुळे संभा यांना सेवानिवृत्ती पर्यंत सेवेत राहू शकणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *