Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post Samayojan Shasan Nirnay ] : राज्य शासनांच्या आस्थापनेवरील 20 पदांचे समायोजन करणेबाबत राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 04 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्याच्या कला संचालनाच्या आस्थापनेवरील 26 पैकी 20 पदांचे समायोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये करणे तसेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे परीक्षा नियंत्रक या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेले आहेत . कला संचालनाच्या अधिपत्याखाली 31 अशासकीय अनुदानित कला संस्था व 178 अशासकीय विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित कला संस्था कार्यरत आहेत , सदर संस्थांचे सनिंत्रण प्रभावीरित्या करता यावेत म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम 1997 च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती .
यानुसार कला संचालनाच्या आस्थापनेवरील 26 पदे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये समायोजित करण्यास सदर मंडळाकरीता 37 नविन पदे निर्माण करण्यास व नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या 37 पदांच्या वेतनासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे .
कला संचालनाच्या आस्थापनेवारी कार्यरत असलेल्या 26 पदांपैकी निरीक्षक 01 पद , या पदाच्या पदनामात सचिव असा बदल होत आहे . तर सहाय्यक निरीक्षक ( 05 पदे ) पदांच्या पदनामात उपसचिव असा बदल होत आहे , सबब सदरचे 06 पदांचे समायोजन करण्याबाबत स्वंतत्र आदेश निर्गमित करण्यात येणार असून , खाली नमुद करण्यात आलेल्या उर्वरित 20 पदे हे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळांमध्ये समायोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
यांमध्ये परीक्षा नियंत्रक , अधिक्षक , प्रमुख लिपिक , टिप्पणी सहाय्यक , लिपिक -टंकलेखक , अधिक्षक या पदांवरील 20 पदांचे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळांमध्ये समायोजित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनाक 04 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.