Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ salaried person various tax saving options ] : नोकरदार वर्गांना करसवलत मिळविण्यासाठी महत्वपुर्ण टिप्स या लेखांच्या माध्यमातुन देण्यात आलेल्या आहेत , यानुसार आपण गुंतवणुक निश्चितच आपले हजारो रुपये वाचणार आहेत , असे कोण-कोणते पर्याय उपलब्ध आहेत , ते पुढीलप्रमाणे सविस्तर पाहुयात ..

डाक विमा योजना ( PLI ) / LIC / PPF  :  पोस्टल लाईफ इन्शुरन्स / ( PLI ) / LIC / PPF  या योजनांमध्ये करण्यात आलेली गुंतवणुक ही आयकर कायदा 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते , आयकर नियमांनुसार 150,000/- रुपये पर्यंतच्या गुंतवणुकीवरच आयकर सुटीचा लाभ मिळते .

गृहकर्ज : आपण जर गृहकर्ज काढले असेल तर आयकर नियम 80 क नुसार मुद्दलावर कर सुट दिले जाते , तर सदरची रक्कम ही 150,000/- रुपये पेक्षा अधिक असू शकणार नाही . तर सदर मुद्दलाच्या व्याजावर कर सुट दिले जाते , पंरतु सदरची मालमत्ता ही स्व-व्यवस्थित असेल अशा प्रसंगीच कर सुट दिली जाते .

केंद्र सरकारच्या पेन्शन योजनांमधील गुंतवणुक : आपण जर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजना , मध्ये गुंतवणुक केली असल्यास आपणांस आयकर कायदा 80CCD 1(B) नुसार 50,000/- रुपय पर्यंतची अतिरिक्त सुट दिली जाते , तर कलम 80 क नुसार 150,000/- रुपयांच्या गुंतवणूकीचा लाभ देखील मिळते .

आरोग्य विमा प्रिमियम / वैद्यकीय उपचारांसाठी देयकावर कर सुट  : आरोग्य विमा प्रिमियम मध्ये 25,000/- रुपये पर्यंत वार्षिक प्रिमियम रक्कम आयकर कलम 80 ड नुसार कर सवलत मिळते . तसेच कलम 80 DD 1B नुसार 40,000/- रुपये पर्यंतची कर सवलत मिळते .

याशिवाय शैक्षणिक कर्जाच्या व्याजामधून दोन मुलांकरीता घेण्यात आलेल्या शैक्षणिक कर्जाची संपुर्ण रक्कमेवर कर सुट दिली जाते . तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्जावर आयकर सवलत देण्यात येते , तसेच घरभाडे भत्ता हा आपल्या पगाराचा भाग नसल्यास , अशा प्रसंगी कलम 80 GG नुसार घर भाडे आयकरांमधून सवलती दिली जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *