Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर तात्काळ सेवानिवृत्तीवेतन / पेन्शनचा लाभ कसा मिळेल या करीता कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीपुर्वीच काही काळजी घेणे आवश्यक असणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर लगेच पेन्शनचा लाभ मिळणार आहे .

कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दोन वर्षांच्या अगोदरच निवृत्तीवेतन संदर्भातील सर्व प्रकारचे प्रकरण सुरु करावेत . यांमध्ये वेतन पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असते , सेवानिवृत्ती पुर्वी मागील पाच वर्षांमध्ये ज्या – ज्या कार्यालयांमध्ये कार्यरत होता , अशा कार्यालयांमधील ना देय प्रमाणपत्र देणे आवश्यक असते .

शिवाय कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित नाही अशा प्रकारचे प्रमाणपत्र संबंधित कार्यालयांकडे सादर करणे आवश्यक असते . तसेच कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाच्या वेळी खालील बाबी तपासल्या जातात .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्वाची माहीती, वाचा सविस्तर माहिती !

यांमध्ये जन्मतारखेची नोंद , हिंदी व मराठी भाषा पास असल्याची वा सुट मिळाल्याची नोंद , पदोन्नती  , आश्‍वासित प्रगती योजना , एकस्तर वेतननिश्चिती , पदोन्नती , बदली , अन्य नियुक्ती आदेश , कार्यमुक्त / हजर नोंदी , मानिव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी अशा प्रकारच्या नोंदी यामध्ये तपासण्यात येतात ..

आपण जर शासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शन धारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *